रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

भारतीय वायू सेनेत एअरमन पदाची भरती


भारतीय वायू सेनेत एअरमन पदाची भरती

भारतीय वायू सेनेत पुरुष उमेदवारांना एअरमन पदाच्या भरतीसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी आंमत्रित करीत आहे. हा मेळावा शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे 17 ते 24 नोव्हेंबर 2015 या कालावधीत होणार आहे. त्यावेळी ग्रुप ‘एक्स’ यात एज्युकेशनल इन्स्ट्रक्टर-शिक्षण प्रशिक्षक या व्यवसायात (ट्रेड) एअरमन आणि ग्रुप ‘वाय’ (अ-तांत्रिक तसेच ऑटोमोबाइल टेक्निकल) व ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर आणि भारतीय वायू सेनेमध्ये पोलीस या व्यवसायांमध्ये एअरमन या पदासाठी होणाऱ्या भरतीमधून भारतीय वायू सेनेत सामील होता येईल. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 7 ऑक्टोबर 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहितीwww.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा